धामणगाव रेल्वे शैक्षणिक

से.फ.ला. विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप

धामणगाव रेल्वे

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणगाव एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. आशिष राठी, धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. असित पसारी, से. फ. ला. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी केले असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावापासून मुक्त राहण्याचे, आणि वर्षभराच्या अभ्यासलेल्या ज्ञानाला नीटपणे परीक्षेत मांडण्याचे निर्देश देत विद्यार्थ्यांना पेपरात स्वच्छ आणि स्पष्ट अक्षरात लेखन करण्याचा सल्ला दिला. शाळेच्या परीक्षा सोबतच जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी होण्यासाठी चांगले संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले..

या कार्यक्रमाला विद्यार्थी वक्ते म्हणून कु. प्रतीक्षा रागोर्ते, (वर्ग १२ वा – कला ) श्रीनिधी देव (वर्ग १० वा) प्रसाद अंबुलकर (वर्ग १० वा) या सर्वांनी विद्यालयाचे सर्व शिक्षक यांचे मनस्वी आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सचिन कुर्लेकर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका कु. आरती भांगे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात उत्तम भविष्य घडवण्यासाठी कणखर, मेहनती आणि योग्य मार्गावर राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना निरोप देताना, शालेय शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांचा यशस्वी आयुष्याच्या दिशेने वाटचाल सुगम होईल, असे सांगितले…
कार्यक्रमाचे मार्गदर्शन पर भाषण धामणगाव सोसायटीचे सचिव व से.फ.ला. हायस्कूल, शाळा समिती अध्यक्ष एड. आशिष राठी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘आयुष्यात नुसते जगायचे नसते तर प्रत्येक कृतीतून शिकत रहायचे असते. ज्ञानाची भूक ज्याला असेल आणि कुठलीही गोष्ट अर्ध्यातून जो सोडत नसेल, त्याला यश मिळाल्याशिवाय राहात नाही. परिक्षेला न घाबरता करता आत्मविश्वासाने सामोरे जावे.’’ असे मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या..
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक महावीर पगारिया यांनी उत्कृष्ट पणे सांभाळले.. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रमोद हातेकर यांनी मानले. समारंभाची समाप्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी जीवनासाठी शुभेच्छा देऊन झाली. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा अंगीकार करण्याचे वचन दिले. समारंभात उपस्थित दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, विद्यालाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!