अपघात धामणगाव रेल्वे

चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनाचा अपघात ; दोन युवक जखमी

१०८ च्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल ; एकाची प्रकृती गंभीर

धामणगाव रेल्वे 

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मलातपुर फाट्याजवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून चारचाकी वाहन क्र. एमएच ०१ ए एल ५३३०  हे रोडखाली पलटी झाल्याची घटना आज दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. त्यामध्ये दोन युवकाला मार लागल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने १०८ वर मदत मागवून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे ताबडतोड पाठविण्यात आले.

हर्षल कोडापे वय- ३४ रा. ऐरणगाव

 

सदर व्यक्तीची ओळख पटली नसून कुणाच्या ओळखीचे असल्यास त्यांच्या नातेवाईकाला कळवावे

दरम्यान ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना एकाची ओळख पटली असून हर्षल कोडापे वय- ३४ रा. ऐरणगाव याला किरकोळ डोक्याला मार लागला आहे तर वाहन चालक गंभीररीत्या बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. वृत्त लिहिस्तोवर वाहनचालकांची कुठलीही ओळख पटली नव्हती. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जिल्हास्तरावर पाठवावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!