आपल्या हक्कासाठी विद्यार्थ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्याचा धामणगावात २ तास चक्का जाम
धामणगाव रेल्वे
नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि कंत्राटदाराला मिळालेल्या अभयामुळे बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला शास्त्री चौक ते से.फ.ला रोड चे बांधकाम २ वर्षांपासून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिशय संथ गतीने रोडचे बांधकाम सुरु असल्याने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी म्हणून त्या रोडवरची जड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात यावे म्हणून मुख्याधिकारी पूनम कळंबे यांनी संबंधित विभागाला पत्र दिले होते. मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचा प्रकार काल झालेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये दिसून आला आहे.

बस पूर्ववत सुरु करण्यासाठी चक्क विध्यार्थ्यानी उचलले आंदोलनाचे पाऊल ; कांग्रेसची साथ
१ जुलै पासून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरु झाली मात्र नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे बस हि शहरात येत नसून मंगरूळ फाट्यालाच विध्यार्थ्यांना उतरून तब्बल ३ किलोमीटर पायी प्रवास करावा लागल्याने त्यांचा संताप अनावर झाला आणि चक्क छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्याकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत त्यांनी सुद्दा प्रत्यक्ष पाठिंबा देत २ तास चक्का जाम करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात ट्रक रस्त्यावर अडविल्याने ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती मात्र पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करीत लहान वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळविले….

तुम्हाला ट्रक चालतो तर बस का नाही – विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. एकीकडे जड वाहतुकीला बंदी असताना त्या रोडने सर्रासपणे ट्रक सुरु आहे त्यावर कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. मात्र बससेवा ही शहराच्या बाहेरूनच फेऱ्या मारत होती त्यामुळे तुम्हाला ट्रक चालतो तर बस का नाही असा संतप्त सवाल विध्यार्थ्यानी केला.















Add Comment