धामणगाव रेल्वे

तहसीलदारांच्या पथकाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

अनुप राऊत यांच्या मालकीचा ट्रॅक्टर जप्त ; आष्टा घाटातून सुरु होती रेती चोरी

धामणगाव रेल्वे

मागील काही दिवसापासून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यावर तहसीरदारांची करडी नजर सुरु असून सातत्याने कारवाई सुरु आहे. अशातच दिनांक २९ नोव्हेंबर २५ रोजी संध्याकाळी ७-४५ दरम्यान तहसिलदार यांच्या गौण खनिज पथकाने मौजा झाडा ते आष्टा रोड वर अवैध गौण खनिज वाहतूक करतांना एम एच २७ एल ११०८ क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. सदर ट्रॅक्टर थांबवला असता ट्रॅक्टर चालक सुमित श्रीराम मेश्राम रा. आष्टा यास अवैध रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. अवैध गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा अनुप राऊत रा. आष्टा यांच्या मालकीचा असून, सदर रेती मौजा आष्टा घाटातून मौजा झाडा येथे घेऊन जात असल्याचे टॅक्टर चालक यांनी सांगितले. सदर ट्रॅक्टर चा व रेतीचा पंचा समक्ष पंचनामा करण्यात आलेला असून दंडात्मक कारवाई करिता सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलेला आहे. सदर गौण खनिज पथकाच्या कारवाई मध्ये मा. तहसीलदार अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व्यंकटी कांबळे ग्राम महसूल अधिकारी बिपीन काळे व सागर भांडवले हजर होते.

इतरत्र कारवाई सुरु असताना गंगाजळी शिवारातील अवैध धंदेवाल्याना सूट का ?

तहसीलदारांच्या पथकाची सातत्याने रेती चोरट्यांवर कारवाई सुरु आहे. मात्र गंगाजळी शिवारातील जेसीबी च्या साहाय्याने मुरुमाची तस्करी राजरोसपणे सुरु असलेला अवैध धंद्यांवर तहसीलदार एवढे मेहेरबान का? हा रास्त प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. तर माहिती देऊनही तहसीलदार कारवाई करीत नसल्याने तत्कालीन नायब तहसीलदारच्या मुलाने प्रशासनाला मॅनेज केल्याची खमंग चर्चा परिसरात सुरु आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!