अमरावती प्रशासन कार्यवाही

तब्बल एक वर्षानंतर सोनल काॅलनी मधील नागरिकाना मिळाला हक्काचा रस्ता

एक वर्षाच्या लढाई नंतर रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित

अमरावती जिल्हा प्रतिनिधी : सुधीर ढगे

शहरातील सोनल काॅलनी व संगीता नगर मधील रस्त्यावर काही नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीचा रस्ता बंद केला होता. त्यामुळे कॉलनीतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. सादर अतिक्रमन विषयी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन सदरच्या विषयावर दुर्लक्ष करीत होते.

अतिक्रमण काढण्याची कारवाई करीत असताना अधिकारी वर्ग 

मात्र अमरावतीला शहराला लाभलेल्या नवीन आयुक्त सौम्य शर्मा यांनी तातडीने दखल घेत दि. २० जून रोजी रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शनिवार दि. २१ जून रोजी अतिक्रमण विभागाचे प्रमुख कोल्हे, झोन १ चे अभियंता काल्मीक आणि डवरे सह पोलीस बंदोबस्तात सकाळी ११ पासून ते ३ पर्यंत अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात आली.

मोकळा करण्यात आलेला रस्ता 

यावेळी कॉलनीतील ७ नागरिकांनी केलेलं अतिक्रमण काढल्याने इतर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. तसेच ३ वर्षातील सर्वात मोठी कारवाई महानगर पालिकांनी केले असल्याचे मत नागरिकांचे असून केलेल्या कारवाईबाबत नागरिकांनी महानगर पालिकांचे आभार व्यक्त केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!