मनपा आयुक्त सौम्य शर्मा यांच्या आदेशानुसार अमरावती महानगर पालिका अतिक्रमण विभाग यानी सोनल कॉलनी मधील लांडगे लेआउट मधील रस्त्यावर ७ लोकानी केलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही शनिवार रोजी केली होती. मात्र दोनच दिवसात पुन्हा त्याच रस्त्यावर अतिक्रमण धारक यांनी रस्त्याची अडवणूक केल्याचे चित्र दिसत आहे. मनपा ने केलेल्या कारवाईचा कोणताच परिणाम अतिक्रमणधारकावर पडल्याचे दिसून येत नसून अधिकारी वर्गाला सुद्धा हे अतिक्रमणधारी जुमानत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा केलेल्या अतिक्रमणावर अतिक्रमण विभाग कोणती कार्यवाही करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Add Comment