मैत्रेय बुद्ध विहार पृथ्वीराज नगर रविवारच्या धम्मदिनानिमित्त आयोजित संघसंवाद कार्यक्रमांमध्ये जातनिहाय जनगणना व अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण या विषयावर प्रसिद्ध आंबेडकर साहित्यिक रमेश जीवने यांनी मार्गदर्शन करताना जाती निर्मूलनाशिवाय लोकशाही राष्ट्राची निर्मिती अशक्य असल्याचे प्रतिपादन केले.
सन २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या संदर्भाने प्रबोधन सत्रामध्ये रमेश जीवने यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत जाती निर्मूलन हा आंबेडकरी चळवळीचा खरा उद्देश असेल तर जातीव्यवस्था नष्ट करणे ही खरी सामाजिक क्रांती ठरेल अशी प्रतिपादन केले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ चे धर्मांतराची चळवळ धम्मदीक्षा ही जाती निर्मलानाच्या उद्देशाने होती हे स्पष्ट केले. आज जातीचे उच्चाटन करून बौद्ध धम्माची पिछेहाट करण्याचे काही विचारवंत समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्धजन असे संबोधले तसेच मी अस्पृश्य राहणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका घेतली होती हे आवर्जून मांडले. बौद्ध धम्मामध्ये जात व्यवस्था नसल्याने बौद्ध समाजाने जनगणनेत पुन्हा जात लिहून जातीव्यवस्था निर्माण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत बौद्धमय करण्याच्या स्वप्नाला तिलांजली ठरेल असे रोखठोक मत मांडले.
बौद्ध धम्मात जात नसल्याची वाच्यता करायची व प्रत्यक्ष जनगणनेत जात लिहिणे हा दुटप्पीपणा बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचारातला अडथळा ठरेल आरक्षण वाचवण्याच्या हेतूने बौद्ध धम्म मात्र संपुष्टात आणण्याचा आपण दृष्ट कावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी प्रबोधनात मांडले. उच्चशिक्षित आरक्षणाच्या लाभार्थ्यांनी आपल्या पिढीला याही पुढे आरक्षण टिकवून ठेवण्याच्या हेतूने चुकीची मांडणी करीत असल्याचे स्पष्ट केले. संविधानातील १९ ३१ ते १९५६ चे संदर्भ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचे पुरावे व शासन स्तरावर झालेल्या अमेंडमेंट यासह सांख्यिकी दृष्टिकोनातून आरक्षण हे सर्व विषय आपल्या प्रबोधनात विस्ताराने मांडले.
भारतात बौद्ध धम्म वाढवायचा असेल व बौद्ध म्हणून आरक्षण मिळवायचे असेल तर जाती ऐवजी बौद्ध हा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर त्यांनी अधिक भर दिला. प्रबोधनानंतर उपस्थित आमच्या शंका व प्रश्नोत्तरांचे सतरा घेऊन शंकांचे निरसन करण्यात आले. वर्ग १० मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही याच कार्यक्रमात घेण्यात आला.
कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी मैत्रेय बहु.संस्था ,जयंती उत्सव समिती, व रमाई उपासिका संघाच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरनतय गाथा घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
Add Comment