नागपूर

निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स

बँकेतील ५१.७० कोटी गैरव्यवहार प्रकरण

नागपूर

एसआयटी कडून निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., नागपूर प्रकरणातील सर्व १२ आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले असून यामध्ये प्रमोद मानमोडे, निर्मला मानमोडे, गौरव मानमोडे, नंदा बांते, वामराव भलवतकर, शिवराज गुजर व इतर आरोपींचा समावेश
आहे.
यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन, नागपूर अंतर्गत नोंद करण्यात आलेल्या या प्रकरणात एसआयटीकडून तब्बल ४८८४ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार सुमारे ५१.७० कोटींचा गैरव्यवहार मुख्यतः प्रमोद मानमोडे संचालित PNG Corporation याचे मार्फत करण्यात आल्याचे समोर येत असून जनतेच्या ठेवींचा अपहार व आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप तपासात पुढे आले आहेत.
सध्या सेंट्रल रजिस्ट्रार मार्फत फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून त्या अहवालानंतर सोसायटीमध्ये आजपर्यंत नेमका किती मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, अफरातफर व अनियमितता झाली याचे संपूर्ण चित्र जनतेसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवी वेळेवर परत न मिळाल्याची तसेच स्वतःचे कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सदर संस्थेवरील जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणावर ढासळल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम सत्य माननीय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!