वर्धा-

कार्यालयीन भ्रष्टाचार विरोधात निलेश केवट यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा

वर्धा प्रतिनिधी

“माहिती अधिकार कार्यकर्ता निलेश केवट यांनी सरकारी कामगार अधिकारी वर्धा यांचे कार्यालयीन भ्रष्टाचाराविरोधात दि.२३/०२/२०२६ रोजी मंत्रालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत पाठपुराव्यावरून सरकारी कामगार अधिकारी वर्धा, कामगार कार्यालयातून कार्यालयाचे शासकीय दस्तावेज गहाळ झाल्याचे निदर्शनात आले असल्याने या प्रकरणात असंघटित कामगारांचे लाभाचे अर्ज, पत्रव्यवहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लाभ मंजुरी बाबतचे आदेश हे कार्यालयात उपस्थित नाही. याबाबत कामगार निलेश केवट यांचे आवास योजना प्रकरणात दिरंगाई होत असल्यामुळे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दाखल करून माहितीची मागणी करत असल्यामुळे अधिकारी कौ.ज. भगत आणि एस.जी. फड तसेच आर. कांबळे या अधिकाऱ्यांनी दस्तावेज जाणून बुजून लपवून ठेवले असावे किंवा फेकून दिले असावे असा संशय निलेश केवट यांनी व्यक्त केला आहे.
निलेश केवट यांनी गेल्या तीन वर्षापासून संबंधित कार्यालयाचे विभाग प्रमुख तसेच वरिष्ठ सर्व अधिकारी यांचे कडे सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा कार्यवाही होत नसल्यामुळे केवट हे दि.२३/०२/२०२६ रोजी मंत्रालय समोर आत्मदहन करणार असल्य्याचा इशारा दिला आहे. निलेश केवट यांच्या मतेमला मानसिक त्रास पोटी सर्व अधिकारी, कर्मचारी दोशी आहे. माझा निर्णय हा ठाम आहे. आपल्या राज्यात लोकशाही ही जिवंत राहिली नाही हा माझा या देशाचा सर्व नागरिकांना संदेश आहे. भ्रष्टाचार थांबायला पाहिजे जनता या देशाची मालक आहे. जनतेने अन्याय विरोधात आवाज उठविणे आवश्यक झालेले मत यावेळी निलेश केवट यांनी मांडले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!