धामणगाव रेल्वे शेती विषयक

धामणगाव बाजार समिती मध्ये नवीन चना खरेदीला सुरुवात

चन्याला सर्वाधिक ५५११ रुपये प्रति क्विंटल मिळाला भाव

धामणगाव रेल्वे

कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती आवारामध्ये गुरुवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी समितीच्या सभापती कविताताई श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते नवीन चना खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी जुना धामणगाव येथील शेतकरी स्वप्निल विंचुरकर यांच्या नवीन चन्याला ५५११ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर भिल्ली येथील शेतकरी आशिष पाटील यांच्या चन्याला ५५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सदरचा भाव ओमप्रकाश लाहोटी व आशिष कापसे यांच्या आडतेमध्ये खरेदीदार मनीष केला यांच्या मनीष ट्रेडर्स मध्ये उत्कृष्ट भाव मिळाला आहे. या शुभारंभीय उद्घाटनिय कार्यक्रमाला चना विक्रीकरिता आणणाऱ्या शेतकरी बंधूंना समितीचे संचालक देवराव बमनोटे, संदीप दावेदार, राधेश्याम चांडक, दिनेश जगताप, डॉ. प्रमोद रोघे, गिरीश भुतडा, मुकुंद माहुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच समितीच्या सभापती यांनी काटा पूजन करून तोलमाप करणाऱ्या हमाल बंधूंचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे तसेच संजय गाडे खरेदीदार मनीष केला, संजय अग्रवाल, सचिन गंगन, प्रदीप कुचेरिया, मनीष भट्टड, राजेश गंगन, माजी संचालक अशोक कांकरिया, नवनिर्वाचित नगरसेवक जगदीश रॉय आडते असोसिएशनचे पवन लाहोटी, प्रवीण पणपालिया, देवराव कापसे, आशिष कापसे, संतोष लाहोटी, नंदू राठी, कैलास राठी, गणेश पणपालिया, दीपक राजनकर, मुकेश पणपालिया, समितीचे कर्मचारी दिनेश गोमासे, दिलीप पाटील, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!