धामणगाव रेल्वे

जळका ( पटाचे ) ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार ?

गावकऱ्यांची मुख्याधिकारी कडे चौकशीची मागणी

धामणगाव रेल्वे 

रोजगार सेवकाच्या नियुक्ती प्रकरणात तालुक्यातील जळका ( पटाचे ) ग्रा. प. गेल्या १ महिन्यापासून चांगलीच चर्चेत आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंचावर चप्पल भिरकावल्या प्रकरणी गावातीलच ४ व्यक्तीवर तळेगाव द. पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यापासून गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून १० फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली तहकूब सभा सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. यावर सुद्धा नागरिक आणि सरपंच यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले.
सदरचा विषय चर्चेत असतानाच “सरपंच आमचा भ्रष्टाचारी” म्हणत गावातील सरपंचाने गेल्या पाच वर्षात ४० ते ५० लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप यावेळी गावातील नागरिकांनी केला असून पुराव्यासहित मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये कामे अपूर्ण असताना सुद्धा त्याचे पूर्ण बिल अदा करणे, कमी दर्जाचे वस्तू वापरून त्याचे अवाढ्यव्य बिल काढणे, तसेच मनरेगामध्ये खोटे मजूर दाखवत ज्यामध्ये शासकीय कर्मचारी यांच्या समावेश सह, स्वतःचे नातेवाईक व जवळच्या लोकांच्या नावाने लाखो रुपये काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळीं १२ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी जिल्हा परिषद अमरावती याना दिलेल्या निवेदनातून केला असून सदर ५ वर्षाची भ्रष्टाचाराची चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर विजय पिलहारे सह इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!