धक्कादायक धामणगाव रेल्वे

मिश्री कोटकर मैदानाच्या बाजूला खाली जागेवर आगीचा तांडव

अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण

धामणगाव रेल्वे 

शहरातील से.फ.ला महाविद्यालयाचे मिश्री कोटकर मैदानाच्या बाजूला खाली जागेवर अचानक आग लागल्याची घटना आज दि. ०५ मार्च रोजी दुपारी ५ च्या सुमारास घडली. उन्हाचा पारा पाहता क्षणातच आगीने रोद्र रूप धारण केल्याने एकाच खळबळ उडाली होती. दरम्यान सदर घटनेची माहिती स्थानिकांच्या मदतीने नगरपरिषद येथील अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली असता तातडीने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यावेळी अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमॅन सचिन कट्यारमल यांच्या मार्गदर्शनात सतीश उईके, प्रशांत रोकडे, हेमंत कापसे यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यातआले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नसून लागलेल्या आगीमध्ये मैदानाच्या बाजूला असलेली ३ मोठी निंबाची झाले मोठ्या प्रमाणात जळाली आहे.

आगीत जळालेली ३ निंबाची झाडे

तसेच सदर घटनेची माहिती ठाणेदार गिरीश ताथोड यांना देण्यात आली असून पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. ज्यामध्ये नवनाथ खेडेकर, उमेश यादव, सह अश्विन राठोड यांचा समावेश होता.  नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसून अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाच्या तत्परतेने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!