धामणगाव रेल्वे शासकीय

हास्यसम्राट भारत गणेशपुरे यांची ढाकुलगाव ग्रा. प. कार्यक्रमाला उपस्थिती

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामाची पाहणी

धामणगाव रेल्वे 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दि. ५ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत ढाकूलगाव येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र हास्यजत्रा फेम भारत गणेशपुरे यांनी उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रा. प. ढाकुलगाव येथे झालेल्या विविध विकास कामाची पाहणी करण्यात आली असून जि. प. शाळा, अंगणवाडी ची सुद्धा यावेली पाहणी करण्यात आली. तसेच विविध पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती येथील अती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य विभाग ) श्रीराम कुलकर्णी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा पा.पु.स्व बाळासाहेब रायबोले, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे प. समिती धा रे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे, विस्तार अधिकारी निलेश वाघ तसेच पंचायत समिती येथील सर्व ग्राम विकास अधिकारी, बीआरसी कर्मचारी यांची उपस्थिती. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकगटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांनी केले व आभार प्रदर्शन ठाकरे महाराज यांनी केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!