अमरावती सामाजिक

जनतेच्या ऐक्याला झुकले प्रशासन – सुशील बेले यांचे आमरण उपोषण मागे

आमदार उमेश यावलकर यांची यशस्वी मध्यस्ती

वरुड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर  

अखेर…. ४ दिवसानंतर प्रशासनाने नमते घेत अनेक मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याशी बैठक आयोजित करून ताडगा काढण्याचे लेखी आश्वासन तसीलदारांच्या हस्ते मिळाल्याने आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. तब्बल ४ दिवसानंतर सायंकाळी ११:३० वाजता तहसीलदार राम शेळके यांच्या उपस्थितीत या आंदोलनाचा तोडगा काढण्यात आला. विधानसभेचे विद्यमान आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांनी यशस्वी मध्यस्थी करून संपूर्ण विषयावर चर्चा केली. त्यांना क्रांतीज्योती ब्रिगेडचे नेते मा. अशोकजी देवते यांनी सक्रिय पाठिंबा देत महत्त्वाची भूमिका निभावली. तहसीलदार साहेब राम शेळके यांनी सर्व मागण्यांबाबत लेखी स्वरूपात पत्र दिले, जे उपोषणकर्ते अविनाश भाऊ बिसांद्रे व राहुल भाऊ लांडगे, पंजाबरावजी ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. अनेक मागण्या तात्काळ मान्य झाल्या असून, उर्वरित मागण्यांसाठी येत्या २६ सप्टेंबर, शुक्रवार रोजी सर्व संबंधित उपजिल्हाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

क्रांतीज्योती ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा, वरुड तालुका, शनिवार पेठ मित्रपरिवार, भोई समाज युवा संघटन, प्रहार जनशक्ती संघटना, वरुड तालुका, सम्यक व संघटन, वरुड जिल्हा संघटन बी.के.डी, खिदमत फाउंडेशन, वरुड, ऑरेंज सिटी थालेसेमिया निर्मूलन समिती, वरुड,अकार्ड फाउंडेशन, वरुड, युवाशक्ती ग्राम विकास संघटना, आक्रोश जनशक्ती महिला संघटन, यंग मुस्लिम समिती या संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. तर संतोष निमगरे (माजी नगरसेवक), जगदीश कोलटकर, राजू सिरस्कार, प्रणय कडू, अशोक गडलिंग (माजी नगरसेवक), पवन प्रकाश देशमुख, राहुल भाऊ फुले (खडका सरपंच), अॅड. पवन वाढवे, समीर शाह, इकबाल काजी, जमीर पठाण, संदीप खडसे, सुशील काकडे, महेंद्र हरले, हितेंद्र सदारामजी लोणारे, महेंद्र गजभिये, मारोतराव भाकरे (बाबुळखेडा सरपंच), पंजाबराव ठाकरे, मनोज लांडगे, उमेश फुले, मनोज बागडे, आशिष रमेश पंत श्रीराव, इंद्रभूषण सोंडे (समाजसेवक), नितीन सीनकर (वरुड शहर अध्यक्ष – शिवसेना शिंदे गट), विनयजी चौधरी, सुकांत यावले, नरेंद्र भाऊ चौधरी, मोहसिन मिर्झा, वसीम अली, नाझीम काझी (अध्यक्ष – यंग मुस्लिम समिती), पिंटू कोरडे, राजूभाऊ गायकी, आश्विन बहुरूपी (उपसरपंच, करंजगाव), सुखदेव उयके (वडली सरपंच), संपतराव नागले (सरपंच काटी), अमर भाऊ हरले, अक्षय तागडे, अंकित राईकवार, शेख सोहल, नितीन भाऊ मनोहरे नितेश डबरासे यांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
विशेष सहकार्य सोपान भाऊ ढोले, अरविंद भाऊ गजभिये विशेष आभार क्रांतीज्योती ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष नंदेशजी अंबाडकर या सर्व संघटना, व्यक्ती व जनतेच्या ऐक्यामुळे आंदोलनाला बळ मिळाले आणि तोडगा काढणे शक्य झाले. आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसत असतानाच, सर्वांच्या आग्रहास्तव व आंदोलनकर्त्यांची बिघडती तब्येत लक्षात घेऊन सुशील बेले यांनी आमरण उपोषण मागे घेतले. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उर्वरित सर्व मुद्द्यांवर तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!