राष्ट्रीय बालकामगार शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाचा लोकशाही मार्ग
अमरावती प्रतिनिधी –
गेल्या अनेक वर्षांपासून बालकामगारांचे होणारे शोषण थांबवून त्यांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पुनर्वसन करण्यासाठी सातत्याने संघटना कार्यरत असताना कोरोना काळापासून पूर्णतः NCLP प्रकल्प पूर्णतः बंद करण्यात आला. त्यामुळे या संघटनांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र शासन दरबारी अनेकदा निवेदने देऊन कर्मचारी वर्गाना पुनर्वसनासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पाठपुरावा करून सुद्धा शासनाने लक्ष न दिल्याने शेवटी या संघटनेमार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
येत्या २९ संप्टेंबर २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व राष्ट्रीय बालकामगार शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. ज्यामध्ये १) NCLP प्रकल्प मधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी याना शैक्षणिक पात्रतेनुसार विनाअटी शासकीय सेवेत समाविष्ट करणे. २) कोरोना काळापासून बेरोजगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत पुनर्वसन करणे. ३) वयाच्या पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देऊन त्यांच्या पाल्याचा समावेश करणे. ४) तसेच १५ ते २० वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशकालीन प्रमाणे वयाची स्थितिलता देऊन कुठल्याही विभागामध्ये नोकरी देऊन समाविष्ठ करणे या चार प्रमुख मागण्या साठी हे एक दिवसीय लक्षवेधी उपोषण महत्वाचे रहाणार असल्याचे मत यावेळी अमरावती जिल्ह्याचे संघटक प्रमुख धर्मशील मेश्राम यांनी व्यक्त केले.
Add Comment