सुरु असलेल्या मुरूम चोरीला तहसीलदारांची मूक संमती ?
धामणगाव रेल्वे
शहराला लागूनच असलेल्या मौजा गंगाजळी शेत शिवारातील परिसरात मेन कॅनल गेल्याने मोठ्या प्रमाणात मुरूम शासकीय जागेवर टाकण्यात आला आहे. त्यावर नेहमीच मुरूम तस्करांचा डोळा असून सातत्याने त्या भागातून मुरुमाची तस्करी केली जाते. त्यामुळे शासनाला करोडो रुपयाचा चुना या तस्करामार्फत लावण्यात आला आहे. सध्या धामणगाव शहरात नगरपरिषद निवडणूक असल्याचा फायदा घेत या तस्करांनी मोठ्या प्रमाणात उन्माद घातला आहे. दि. २८ नोव्हेंबर रोजी भरदिवसा मुरुमांवर जेसीबी लावून टिप्पर च्या साहाय्याने मुरुमांची चोरी सुरु होती. दिवसा ढवळ्या सुरु असलेल्या या चोरी संदर्भात गावातील एका व्यक्तीने तलाठी यांना माहिती दिला असता सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले तर मंडळ अधिकारी यांनी मी निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगितले, तर तहसीलदार अभय घोरपडे यांनी कर्मचाऱ्यांना पाठविते म्हणून सांगितले मात्र दिवसाअखेर कुठलेच प्रशासनाचे कर्मचारी त्या ठिकाणी आले नाही. हे मात्र विशेष ..
सुरु असलेल्या मुरूम चोरीला तहसीलदारांची मूक संमती ?
राजरोसपणे अवैध मुरुमाची चोरी होत असल्याची माहिती तहसीलदार अभय घोरपडे यांच्यापर्यंत दिली असताना देखील निवडणुकीचे कारण देत कुठलेच प्रशासन कार्यवाही साठी आले नाही. मात्र तहसीलदाराला फोन केल्यानंतर १० मिनिटातच जेसीबी आणि टिप्पर त्या ठिकाणाहून बाहेर काढून रोडवर उभ्या केली जाते. त्यामुळे सदरच्या अवैध मुरूम चोरीला तहसीलदारांची मूक संमती तर नाही असा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्याला पडला आहे.














Add Comment