धामणगाव रेल्वे शैक्षणिक

स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये सामाजिक उपक्रम ; ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता

धामणगाव रेल्वे

सहानुभूती, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा हृदयस्पर्शी आदर्श साकारत स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे येथील विद्यार्थी व कर्मचारी यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी माननीय पं. श्री शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांच्या जयंतीनिमित्त “जॉय ऑफ गिव्हिंग” उपक्रम उत्साहात साजरा केला. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून थोड्या-थोड्या प्रमाणात तांदूळ आणून शाळेत संकलित केले. संकलित तांदूळ नंतर मातोश्री वृद्धाश्रम, पुलगाव येथे पाठविण्यात आला. विद्यार्थी परिषदेचे सदस्य व शिक्षिका मनीषा मलवार, प्रविण टोंगे, निकिता ढोले व गौरी वानखेडे यांच्यासह वृद्धाश्रमात स्वतः जाऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक तांदुळाचा वाटप करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला, त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच समाजात ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व व त्यांच्याप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून घेतली. हा उपक्रम उप-प्राचार्य तुषार रेवटकर व प्रशासन अधिकारी प्रितेश जानवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
शाळेच्या प्राचार्या प्रचीती धर्माधिकारी यांनी विद्यार्थि व पालकांच्या उदारतेचे कौतुक करताना सांगितले, “गरजूंसोबत आपले अन्न वाटून विद्यार्थ्यांनी जीवनातील सर्वात मोठा धडा—मानवता—शिकला आहे.” या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वंचित घटकांप्रती निःस्वार्थ सेवा, करुणा व संवेदनशीलतेची मूल्ये रुजवणे हा होता.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!