धामणगाव रेल्वे
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणगाव एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. आशिष राठी, धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. असित पसारी, से. फ. ला. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी केले असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावापासून मुक्त राहण्याचे, आणि वर्षभराच्या अभ्यासलेल्या ज्ञानाला नीटपणे परीक्षेत मांडण्याचे निर्देश देत विद्यार्थ्यांना पेपरात स्वच्छ आणि स्पष्ट अक्षरात लेखन करण्याचा सल्ला दिला. शाळेच्या परीक्षा सोबतच जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी होण्यासाठी चांगले संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले..















Add Comment