धामणगाव रेल्वे प्रशासन

उडन पथकाची छापेमार तपासणी संशयास्पद ? एकही अवैध सिलेंडर मिळाले नाही हे न पटणारे !

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरासंबंधी व्यवसायिकांना दिल्या कडक सूचना

धामणगाव रेल्वे 

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी तहसील स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या उडन पथकाने गुरुवारी शहरातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट, चहाच्या टपऱ्या तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर अचानक तपासणी मोहीम राबवली. या वेळी तहसीलदार अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी प्रवीण भागवत आणि पुरवठा निरीक्षक साधना राऊत यांनी गॅस सिलेंडरच्या वापराची सखोल तपासणी केली. तपासणीनंतर उडन पथकातील अधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल चालक, हातगाडी चालक तसेच इतर व्यवसायिकांना कडक सूचना देत सांगितले की, कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केले की घरगुती गॅस सिलेंडर हे केवळ घरगुती वापरासाठीच निर्धारित असून त्यांचा व्यावसायिक वापर करणे नियमांचे उल्लंघन आहे.

एकही अवैध घरगुती गॅस सिलेंडर सापडला नाही, हे न पटणारे !

घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक वापर होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाने ही विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान उडन पथकाने शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, चहाच्या टपऱ्या तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर जाऊन गॅस सिलेंडरची तपासणी केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही काळ व्यवसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र तपासणीदरम्यान कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यावसायिक वापर आढळून आला नसल्याचे मत तपासणी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, मात्र अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेले मत कुठेही मनाला न पटणारे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धामणगावात व्यावसायिकाकडून ८० टक्के वापर हे घरगुती सिलेंडर चा करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुरुवारी अचानक झालेल्या उडन पथकाची छापेमार तपासणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान उडान पथकाची छापेमार तपासणी नियमित होणार कि, हा फक्त दिखावा होता हे पाहणे देखील तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!