धामणगाव रेल्वे सामाजिक

धामणगावात प्रभू विश्वकर्मा यांची जयंती उत्साहात साजरी

आमदार प्रताप अडसड सह उ.बा.ठा जिल्हाप्रमुख मनोज कडू यांची प्रमुख उपस्थिती

धमगणाव रेल्वे 

सुतार समाज मंडळाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे सुतार समाजाचे आराध्य दैवत श्री. प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्री प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच समाजासाठी मोठे योगदान देत आलेले जेष्ठ समाज सुधारक ज्ञानेश्‍वर सोनेकर व समाजासाठी नेहमी धडपड करणारे व मोलाचे मार्गदर्शन करणारे राजेंद्र कोळमकर यांचे सुतार समाज मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
श्री. प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंती महोत्सवाला धामणगाव रेल्वे विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार प्रताप अडसळ यांनी भेट दिली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांनी सुद्धा कार्यक्रमाला भेट दिली. दोन्ही मान्यवरांनी श्री प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर समाजाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात सुतार समाज मंडळातील सर्व सदस्य गण साजरी करतात. यामध्ये तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. या कार्यक्रमात भक्तिमय गीत, भजन, महाआरती करण्यात आली. तसेच सुतार समाज बांधवांनी व नागरिकांनी हजारोच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी सुतार समाज मंडळाचे अध्यक्ष नाना देऊळकर, उपाध्यक्ष दिलीप विलायतकर, सचिव मुरलीधर मासोदकर, सदस्य अनिल वानखेडे, दीपक धनस्कर, अमोल दरवळकर,आनंद अटाळकर, प्रशांत चांदूरकर, प्रमोद सोनेकर ,संकेत कोळमकर, अनुप राऊतकर, प्रवीण रुईकर, निलेश मेहकर, विजय आकोटकर, आदी सर्व सुतार समाज बांधव उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!