धामणगाव रेल्वे

विविध माध्यमातून धामणगावकरांनी दिली महामानवाला मानवंदना

धामणगाव रेल्वे

६ डिसेंबर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन हा दिवस कला दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. महामानवाच्या जाण्याने जणू दलित, पीडित, शोषित वर्ग हा पोरका झाला. माणसाला माणूस म्हणून जगणाच्या अधिकार ज्या महामानवामुळे मुळे ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे नाथमस्तक होण्यासाठी जातात. तर अनेक व्यक्ती हे विविध माध्यमातून त्यांना आदरांजली वाहतात. अशातच धामणगाव रेल्वे येथे सुद्धा विविध माध्यमातून महामानवाच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी धामणगावकरांनी पहाटे ६ पासूनच नगरपरिषद येथील महामानवाच्या पूर्णाकृती पुतड्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली हाती.

समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तर्फे पथसंचलन करून वाहिली आदरांजली

सकाळी १० च्या सुमारास समता सैनिक दल तसेच भारतीय बौद्ध महासभा यांनी संयुक्तरित्या शहरातून पथसंचलन करीत नगरपरिषद प्रांगणात एकत्रित येत महामानवाला आदरांजली वाहिली. यावेळी समता सैनिक दल तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारी, लहान मूल, महिलावर्ग तसेच पुरुष वर्ग उपस्थित होते.

 

रक्तदानाद्वारे महामानवाला अभिवादन ; सलग १६ वर्षांपासून रक्तदान समितीची उल्लेखनीय उपक्रम

मागील १६ वर्षांपासून रक्तदानाचा उपक्रम राबवून रक्तदान समितीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करण्यात येते. यावर्षी सुद्धा रक्तदान समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबरीचे आयोजन करण्यात आले असताना ६५ रक्तदात्याने आपले रक्त दान करून महामानवाला अभिवादन केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान समितीच्या टीमने अथक परिश्रम घेत शिबीर यशस्वीरीत्या पार पाडले. तर या शिबिराला प्रभारी तहसीलदार आशिष वीर, नायब तहसीलदार वसंत पखाले, दत्तपूर चे ठाणेदार गिरीश ताथोड तसेच त्यांच्या टीमने उपस्थिती दर्शवून महामानवाला अभिवादन केले.

कँडल मार्च च्या माध्यमातून महामानवाला अभिवादन.

नगर परिषद प्रांगणात असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी असून असताना दिवसभर विविध उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले तर तर सायंकाळी सुद्धा कँडल मार्च च्या माध्यमातून अतिशय शांत पद्धतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले असताना सर्व महिला पुरुष एकत्रित येत महामानवाला अभिवादन करून आदरांजली देण्यात आली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!