धामणगावात भाजपा महिला आघाडी मेळावा
धामणगाव रेल्वे
धामणगावच्या विकासात कोणताही हातभार नाही केवळ आरोप करणे हाच धंदा असलेल्या व महिला खर्रा खातात म्हणणाऱ्या दोडक्या भावाला या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.
धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार अर्चना अडसड रोठे व नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या भाजपाच्या वीस उमेदवारांच्या प्रचारार्थ वाघ आज आल्या होत्या आरोही रिसॉर्ट येथे आयोजित भाजपा महिला मेळाव्याला संबोधित करताना त्या म्हणाल्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी बालपणापासून तर संपूर्ण आयुष्यासाठी विविध योजना आणल्या त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळत असताना काही दोडके भाऊ महिलांच्या विरोधात बोलतात या दोडक्या भावाला या निवडणुकीत धडा शिकवा असा अप्रत्यक्ष टोला त्यानी माजी आ विरेंद्र जगताप यांना मारला.















Add Comment