आरोग्य विषयक धामणगाव रेल्वे

सहायक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती यांनी साधला नागरिकांसोबत सवांद -मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी

कामनापूर घुसळी येथे कुष्ठरुग्ण शोध मोहीम, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न

धामणगाव रेल्वे –

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमल बजावणीचा निर्णय घेतला आहे. त्याचं अनुषंगाने तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत घुसळी कामनापूर येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता डॉ. पुनम मोहोकर, सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती, गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांनी गावाला भेट देऊन गावाची प्रत्यक्ष पाहणी केली, यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक सुदेवाड तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे आरोग्य विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरातील १०१ नागरिकांनी आरोग्य तपासणी केली, शिबिरात २० रक्तदात्यानी रक्तदान करत रक्त चाचणी केली. गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास तेथील रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.

त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधण्यात आलेल्या शालेय शौचालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच गावामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या घरकुलांना भेट देऊन लाभार्थ्यांच्या हस्ते घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले. सोबतच शाळा, अंगणवाडी केंद्र, वाचनालय यांना सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची पाहणी करण्यात आली. तथा ग्रामपंचायत च्या सर्व दस्तऐवज तपासले. त्यांच्या या कार्यामध्ये अमोल गेडाम, निलेश वाघ विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सुद्धा या कार्यात त्यांना मदत केली. या सर्व अभियानाच्या तपासणीमध्ये पंचायत समिती स्तरावरून प्रेमकुमार अंबुलकर, गट समन्वयक( स्व. भा. मि) व विशाल सुटे समूह समन्वयक (स्वच्छ भारत मिशन) अजय सरदार अमित ढवळे (उमेद अभियान) त्याचबरोबर बी. एम सरदार प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य विभाग यांची सुद्धा मोलाचे सहकार्य करीत उपस्थिती दर्शवली.

यावेळी प्रामुख्याने मोहन घुसळीकर माजी जी. प. सदस्य, सरपंच राजेंद्र बांते, उपसरपंच सुभाष डवले, ग्रामपंचायत अधिकारी एस. एम.चव्हाण, कर्मयोगी फाऊंडेशन पथक, चंद्रशेखर कडू पोलीस पाटील,जगदीश कारगळे, डॉ. वसंत खंदार, विठ्ठल शेंडे, शंकर सयाम, अशोक मोहड, शुभम देशमुख, अजय ठवकर, ऋषींकेश वानखेडे, योगेश हजारें, निलेश इडपाते, ऋषिकेश लोणकर, यश काटगळे, जयपाल बांते, अनिल बगाडे, गोपाल भापकर, स्वपील भापकर, विनोद तितरे, अशोक चामलाटे, महिला बचत गटाच्या सीआरपी अध्यक्ष शोभाताई घुसळीकर, तर जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीअमरावती डॉ. राहुल खराते, रक्त संक्रमन अधिकारी, योगेश पानझाडे, मिलिंद तायडे जनसंपर्क अधिकारी, रशमी मुळे आधीपरिचारिका, मंगेश उमप, प्रवीण कळसकर तर आरोग्य विभागातील डॉ. उज्वल गुल्हाने, डॉ. प्राजक्ता वानखेडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दीपाली देशमुख,जिल्हा पर्यवेक्षक शैलेद्र भोयर,कुष्ठरोग तंत्रज्ञ् मनीषा चव्हाण,आरोग्य सेवक संतोष राठोड,पायल राऊत, पुष्पा वाढवे, आरोग्य सेविका ज्योती रंगारी, संगणक परिचालिका आशा स्वयंसेविका आश्विनी थोरात, सुनीता गिधाने, अंगणवाडी सेविका निर्मला गिधाने, संगीता थोरात आदी गावातील युवक मंडळी नागरिक उपस्थित होते.

 

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!