धामणगाव रेल्वे

से.फ.ला. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारले गणराय

गणपती चित्र सजावट स्पर्धेला ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे, धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फत्तेलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य पूर्वीच्या गणेशोत्सवाला ९७ वर्षे पूर्ण झाली. या ९८ व्या वर्षी सुद्धा कित्येक वर्षापासून शालेय गणेशोत्सवानिमित्त विद्यालयात गणपती चित्र सजावट स्पर्धा व पर्यावरण पूरक मातीचे गणपती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या अभिनव कौशल्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

गणपती चित्रसजावट स्पर्धेमध्ये कोलाज या माध्यमातून गणपतीची चित्र सजावट करण्यात आली. त्यात विद्याध्यांनी पाने, फुले, माती, वाळू, काड्या, धान्य विविध डाळ, रंगीत धागे, रंगीतक्ले, रंगबिरंगी स्टोन, विविध रंगीत कागद, क्युलिग चे पेपर बांगड्‌या, रांगोळी, शिंपले,सुतळी, वर्तमान पत्र, विविध कापड, आगपेटी काड्‌या अशा विविध माध्यमांचा वापर करून गणपतीचे सुंदर चित्र सजावट करून विदयाध्यांनी वैशिष्टपूर्ण गणराय साकार केले. स्पर्धेत पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये मिडल विभागातून प्रथम क्रमांक- मनस्वी सावळे (वर्ग ७ वा) द्वितीय क्रमांक- श्रुती धुरट (वर्ग ७ वा) तृतीय क्रमांक- जस्मितकौर बोका (वर्ग ७ वा) व उत्तेजनार्थ रुद्र दाभाडे (वर्ग ७ वा) मध्ये आले… हायस्कूल विभागामधून प्रथम क्रमांक- प्रीत बोका (वर्ग १० वा) द्वितीय क्रमांक- यश ठाकरे (वर्ग ७ वा) तृतीय क्रमांक- विधी ढोबळे (वर्ग ९ वा) व उत्तेजनार्थ- रीझा अकबानी (वर्ग १० वा ) मध्ये हे आले…

विद्यार्थ्यांनी साकार केले १०० च्या वर पर्यावरण पूरक मातीचे गणपती  

या शालेय गणेशोत्सव निमित्त पर्यावरण पूरक मातीचे गणपती तयार करण्याची स्पर्धा विद्यालयात घेण्यात आली..
त्यामध्ये मिडलस्कूल विभागामधून प्रथम क्रमांक-आरुषी सुरजुसे (वर्ग ७ वा ) द्वितीय क्रमांक – स्वरांगी ढाले ( वर्ग ७ वा ) तृतीय क्रमांक – सिद्धी कावळे (वर्ग ५ वा) उत्तेजनार्थ – आरुष भोंगाडे ( वर्ग ७ वा ) हायस्कूल विभागांमधून प्रथम क्रमांक – स्पर्शिका मनोहर (वर्ग १० वा ) द्वितीय क्रमांक- राजवीर यादव ( वर्ग ८ वा ) तृतीय क्रमांक- श्लोक ठाकूर (वर्ग – ८ वा ) उत्तेजनार्थ- लावण्या कुमरे (वर्ग ९ वा ) मध्ये आले..
स्पर्धेची धुरा व कल्पना कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी सांभाळली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करून गणपतीचित्र सजावट स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रमोद हातेकर, पर्यवेक्षक नरेश कावलकर व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्याथ्यर्थ्यांचे कौतूक अभिनंदन केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!