धामणगाव रेल्वे

मुख्य. युवा प्रशिक्षणार्थीचा तहसील कार्यालयावर धरणा

विविध मागण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांचे एक दिवसीय आंदोलन

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

महाराष्ट सरकारने निवडणुकांपूर्वी निवडून येण्यासाठी राज्यात लाडक्या बहिणीसह अनेक योजना सुरु केल्या. त्या योजनांच्या भरोश्यावरच सरकार सुद्धा प्रस्थापित झाले मात्र निवडून येताच निवडणुकांपूर्वी दिलेले आश्वासनापासून प्रशासन नकारात्मक भूमिका घेताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय असा कि, ज्यांच्या भरवश्यावर आज प्रशासन सत्ता गाजवत असताना त्यांनी मतदारांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी मु. युवा प्रशिक्षणार्थी याना आहे त्या आस्थापनेवरच नियमित करण्याचे संबोधिले होते. मात्र त्यांचे हे शब्द आता हवेत विरले असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी काळात ६ महिन्याच्या प्रशिक्षणानंतर अनेक आंदोलन निदर्शने झाले असताना आणखी ५ महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला गेला मात्र आता तो सुद्धा कार्यकाळ संपुष्टात येत असताना पुढे काय ? हा प्रश्न सातत्याने प्रशिक्षणार्थीना भेडसावत आहे. त्यामुळे प्रशासनाला त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडता कामा नये, यासाठी विविध ठिकाणी आता प्रशिक्षणार्थी यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.
ज्यामध्ये १) गेल्या ३ महिन्यापासून विद्यावेतन न झाल्यामुळे प्रशिक्षणार्थीवर उपासमारीची वेळ आली असताना तात्काळ पूर्ण वेतन देण्यात यावे.
२) ११ महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आहे त्याच आस्थापनेवर कायमस्वरूपी करून किमान वेतन कायद्यानुसार २०००० मानधन देण्यात यावे.
३) रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे.
४) वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीना १०% राखीव ठेवण्यात याव्या.
अशा विविध मागण्यासाठी उद्या दि. ०७ ऑक्टोबर २५ रोजी धामणगाव रेल्वे येथील पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा मुख्य युवा प्रशिक्षणार्थींच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी युवाहित युवा कार्यप्रशिक्षणार्थी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रकाश साबळे, संघर्ष मोर्चा संस्थापक अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन आयोजित केले असून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी यांनी उद्याच्या धरणे आंदोलनाला उपस्थिती दर्शविण्यासाठी धामणगाव रेल्वे चे तालुका अध्यक्ष प्रीतम घुंगरूड यांनी आवाहन केले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!