धामणगाव रेल्वे

धामणगावात कृ.उ.बा.स. मध्ये नविन सोयाबीन खरेदीला सुरुवात ; आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

प्रति क्विंटल ४ हजार ५२१ रुपये भाव

धामणगाव रेल्वे 

नुकताच बाजार समिती संघाकडुन विशेष पुरस्कार प्राप्त झालेली बाजार समिती तसेच शेतकरी हितासाठी व सोईसुविधेकरीता प्रसिध्द असलेली बाजार समितीमध्ये बुधवारला (ता.१) माजी आमदार प्रा.विरेन्द्र जगताप यांच्या हस्ते नविन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.नविन सोयाबीन खरेदीला ४ हजार ५२१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते काटापूजन करून नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती संगिता संजय गाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पंकज वानखडे, बाजार समितीचे संचालक राधेश्याम चांडक, प्रमोद रोंघे, मंगेश बोबडे, देवरावजी बमनोटे, संदीप दावेदार, दिनेश जगताप, मुकुंद माहोरे, प्रशांत हुडे, गिरीष भुतडा व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
     सर्वप्रथम व प्रतिमेचे व काटयाचे पुजन करण्यात आले. मापारी बंधुंचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या शुभारंभ सोहळ्यात माजी आमदार विरेन्द्र जगताप यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, सर्वप्रथम बाजार समितीला विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तालुक्यातील तथा महाराष्ट्रामध्ये सततच्या होणा-या पावसामुळे शेतमालाचे पुर्णतः नुकसान झालेले आहे. शेतीमालाला लागलेली किंमत तथा मेहनत पुर्णतः वाया गेलेली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन शेतातच सडुन गेलेले याबाबत आमचे मोर्चे आंदोलने सुरु आहे. दिवाळीपर्यन्त शेतकरी बंधुंना शासनाकडुन मदत न मिळाल्यास आम्ही शेतकरी बंधुसोबत काळी दिवाळी साजरी करु असे अध्यक्षीय भाषणात म्हणाले.

नवीन सोयाबीन विक्री करीता आणणारे सर्कसपुर येथील शेतकरी गोविंद कडु यांच्या सोयाबीनला ४५२१ रुपये, वसाड येथील गजानन गवई यांच्या सोयाबीनला ४४५१ रुपये, मालखेडचे पृथ्वीराज देशमुख यांच्या सोयाबीन ला ४४५१ रु. शुभारंभ प्रसंगी भाव देण्यात आला. त्यांचा माजी आमदार प्रा. जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाजार समितीला सर्वाधिक सेस देणारे व्यापारी संजय अग्रवाल, मनिष केला यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तोलमाप करणारे प्रशांक कोहाळ गोपाल वानखडे, दिवाकर काकडे, अरुण ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समितीमध्ये सर्वाधिक आवक बोलविणारे आडते पवन लाहोटी, आडते असोसिएशन अध्यक्ष सुरेन्द्र जयस्वाल यांचा समितीच्या सभापती कविता गावंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी प्रशांत सबाने चंदु डाहाणे, सुनील भोगे, भाऊराव अडकणे, मंगेश कडु, अविनाश इंगळे, संजय धामंदे, जयंत ठाकरे, सतीश मोकाती, प्रशांत वानखडे, संतोष पळसापुरे, संजय गाडे, प्रशांत वानखडे, व्यापारी संजय अग्रवाल, मनिष केला, प्रदीप कुचेरीया, सचिन गंगण, प्रेमकुमार टावरी, राजेश गंगण, मनिष भटटड, शैलेश लाहोटी, कैलास वसाणी, तेजेस डुबे आडते असोसिएशनचे अध्यक्ष सुरेन्द्र जयस्वाल, पवन राठी, प्रदीप राठी, रितेश राठी प्रमोद मुंधडा राजेन्द्र पनपालिया, महेश गंगण, दिपक राजनकर, संतोष राजनकर, देवराव कापसे, आशिष कापसे, आनंद कांकरीया, सचिन राठी तसेच समितीचे कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन समितीचे सचिव प्रविण वानखडे यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी सर्व सेवा सुविधा बाजार समितीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार आवारातच विक्री करावा.
कविता श्रीकांत गावंडे, सभापती कृ. उ.बा. समिती धामणगाव रेल्वे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!