चांदुर रेल्वे

चांदुर रेल्वे पंचायत समितीत एकदिवसीय ग्रामपंचायत “विकास आराखडा” प्रशिक्षण संपन्न

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

चांदुर रेल्वे

पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२६-२७ अंतर्गत क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १७ जून २६ रोजी चांदुर रेल्वे पंच्यात समिती येथे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाला पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय खारकर, सह विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका व्यवस्थापक अनिकेत पाटील (RGSA BM) यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षण मंचावर उपस्थिती मान्यवर 

प्रशिक्षणामध्ये गटविकास अधिकारी संजय खारकर, सह तालुका व्यवस्थापक अनिकेत पाटील यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती मधील विकास कामासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन आले. तसेच विविध सूचना दिल्या.

यावेळी तालुका स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाला चांदुर रेल्वे पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय खारकर, सह विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका व्यवस्थापक अनिकेत पाटील (RGSA BM) सर्व प्रशासक ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी. तसेच सर्व खातेप्रमुख यांच्यासह उपसरपंच व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!