चांदुर रेल्वे

मरणानंतरही धीरज देणार इतरांना जीवनदान ; कलावटे कुटुंबीयांचा निर्णय समाजापुढे ठरला आदर्श

वडील संतोष कालावटे व कुटुंबानी घेतला अवयवदानाचा निर्णय

चांदूर रेल्वे :- प्रतिनिधी

साधारणता एक आठवडापूर्वी आपल्या मित्रां परिवारांसोबत केदारनाथ व बद्रीनाथ यात्रेवरून परत आलेला धीरज आपल्या पाच मित्रासह तळेगाव येथे गेला होता. तळेगाव वरून परत येताना कार चा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये धीरजचा मित्र ललित युवराराज सवाने (वय ३० वर्ष) याचा जागीच मृत्यू झाला तर धीरज च्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्या कारणाने त्याला ताबडतोब अमरावती येथील रेडीयंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले असून दुर्दैवाने सर्व प्रयत्न फोल ठरले व काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी धीरज ची मृत्युशी झुंज सरली व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

धीरज हा अनेक समाजिक व धार्मिक कार्यात हिररीने सहभागी होत होता. स्वभावाने अतिशय सरल व मनमिळाऊ व्यक्तिमत्व त्याचे सर्वांशी स्नेह होता. धीरजच्या अकाली निधनाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धीरजच्या परिवारात आई-वडील, एक लहान बहीण व दोन काका असा मोठा आप्त परिवार असून ह्या संपूर्ण परिवाराने धीरजच्या मरणोपरात आपले दुःख बाजूला सारून त्याच्या अवयव दानाचा निर्णय घेतला असून नागपूरवरून डॉक्टरांच्या एका टीम ने अवयव दानाची ही प्रक्रिया पार पाडली. कालावटे कुटुंबीयांच्या ह्या आदर्श निर्णयाचे समाजाच्या सर्वच स्तरावरून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!