जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा आडगाव राजा येथे नाविन्यपूर्वक उपक्रम
सिंदखेड राजा प्रतिनिधी – दिपक म्हस्के
तालुक्यातील ऐतिहासिक ग्राम आडगाव राजा येथे दि. ०४ जुलै २०२६ रोजी जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, आडगाव राजा येथे चि. चैतन्य गजानन कहाळे याचा ४ था वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.
विशेष म्हणजे, चैतन्य हा अंगणवाडीतील विद्यार्थी असून त्याच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील लहान मुलांना वही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रेरणा वाढावी या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.















Add Comment