धामणगाव रेल्वे

अखेर…… चौथ्या दिवशी निवृत्त ग्रा. प. कर्मचाऱ्याचे उपोषण मागे ; मागण्या मान्य !

प्रहार तालुका प्रमुख सुरज गंथडे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांची यशस्वी मध्यस्थी

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील निंभोरा बोडखा ग्रामपंचायत प्रशासनाला अखेर लोकशक्ती आणि संघटनात्मक ताकदीपुढे गुडघे टेकावेच लागले! आपल्या हक्काच्या पैशांसाठी गेल्या ४ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे निवृत्त कर्मचारी श्रीकृष्ण विठोबाजी चोले यांच्या वज्रनिर्धाराला अखेर यश आले आहे. आज १८ जून २०२६ रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी गावकऱ्यांचा आणि ‘प्रहार’ संघटनेचा वाढता आक्रोश पाहून प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच पळापळ झाली.

‘प्रहार’ पक्षाचे तालुका प्रमुख सुरज गंथडे यांचा आक्रमक पवित्रा आणि प्रशासनाची मध्यस्थी

गेल्या ४ दिवसापासून आपल्या हक्काच्या पैशासाठी ग्रा. प. कर्मचारी श्रीकृष्ण चोले उपोषणाला बसले असताना त्यांच्या ढासळत चाललेल्या प्रकृतीमुळे ग्रा. प. प्रशासनाला नमते घ्यावे लागले. प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरज गंथडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी दोन दिवसापासून धाव घेत त्यांच्या समस्या जाणून घेत ग्रा.प. प्रशासनाला प्रश्नाची सरबत्ती केली. ‘प्रहार’च्या या दणक्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता मंगरूळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद आहेर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला, तर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखेडे यांनी सुद्द्धा या उपोषणास्थळी स्वतः हजर राहत विशेष लक्ष घातले.

‘तांत्रिक अडचणीं’चा फुगा फुटला! लेखी पत्रात नेमके काय ठरले

अधिकृत पत्राने प्रशासनाचा वर्षानुवर्षांचा वेळकाढूपणा चव्हाट्यावर आणला आहे. ज्या मागण्यांना वरिष्ठ पातळीचे कारण सांगून टाळले जात होते, त्यावर सरपंच, सचिव आणि प्रशासकांनी स्वाक्षरी केली आहे ८ ते १५ दिवसांत पूर्ण हिशोब करून कर्मचारी चोले यांची २०१२ ते २०१७ पर्यंतची मानधनाची आणि इतर सर्व थकीत रक्कम पुढील निकाली काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाला द्यावे लागले आहे. ५०% रक्कम तात्काळ रोखीने एकूण हक्काच्या रकमेपैकी ५०% रक्कम तात्काळ रोखीने चोले यांच्या हातात टेकवण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. उर्वरित ५०% रक्कम ही टप्प्याटप्प्याने देण्याचे लेखी मिळाल्याने उपोषणकर्ते श्रीकृष्ण चोले यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी लेखी आश्वासनाची अंमलबजावणी जर झाली नाही तर उपोषकर्त्याच्या बाजूला मी सुद्दा उपोषणाला बसणार अशा कडक इशारा यावेळी सुरज गंथडे यांनी दिला आहे.
सहायक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांच्या हातून उपोषणकर्त्याला थंडपेय पाजत उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मंगरूळ दस्तगीर चे ठाणेदार शरद आहेर, सुरज गंथडे प्रहार तालुका प्रमुख ग्रामसेविका किशोरी पारेकर, सरपंच सचिन बमनोटे, उपसरपंच बांते यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!