धामणगाव रेल्वे

धामणगाव पंचायत समितीमध्ये एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा संपन्न

धामणगाव रेल्वे

दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, धामणगाव रेल्वे येथे एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. सभेला आमदार प्रताप अडसड यांची अध्यक्षस्थानी उपस्थित होती.

सभेमध्ये धामणगाव रे विधानसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य संस्थांमधील रिक्त पदांची स्थिती, आवश्यक मनुष्यबळ, आरोग्य सेवांच्या उपलब्धतेबाबत तसेच नव्याने सुरू झालेल्या आरोग्य संस्थांच्या इमारती, उपलब्ध सुविधा व आवश्यक सुविधा-सुविधांचा पुरवठा याबाबत चर्चा करण्यात आली.

आमदार प्रताप अडसड यांनी मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आरोग्य संस्थांमधील प्रलंबित प्रश्नांचा समन्वयाने निपटारा करण्यावर भर देण्यात आला. सभेच्या माध्यमातून धामणगाव रेल्वे मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व आढावा घेण्यात आला….

यावेळी नायब तहसीलदार ऋतुराज पटोरकर, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे, (तालुका आरोग्य अधिकारी धामणगाव रे डॉ. विवेक सुदेवाड, राणी माळवे (गटविकास अधिकारी), डॉ. प्रियंका निकोसे (तालुका आरोग्य अधिकारी) चांदूर रे, डॉ स्नेहल शेलार (गटविकास अधिकारी) डॉ. प्राजक्ता वानखडे (तालुका आरोग्य अधिकारी ) नांदगाव खंडेश्वर, प्राजक्ता पाटील (बालविकास प्रकल्प अधिकारी), उपअभियंता महावितरण तसेच तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!