धामणगाव रेल्वे

चोरट्यांकडून रामगावात किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न

धामणगाव रेल्वे

शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रामगाव या गावातील नरेश काळपांडे यांचे किराणा दुकान चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न केल्याची बाब दि. ३१/०८/२०२६ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

दुकानदार नरेश काळपांडे हे नेहमीप्रमाणे सकाळी उठून आपले किराणा दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाच्या दरवाज्याला लावलेले कुलूप तसेच कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र दुकानाच्या आत शिरून पाहिले असता कोणतेही साहित्य अथवा चोरी झाली नसल्याची त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सुटकेचा स्वास घेतला.

कोणतेही नुकसान झाले नसले तरी चोरट्यांकडून मध्यवस्तीत असलेल्या दुकानाचे कुलूप आणि कडी कोंडा तोडल्याने सध्यस्थित गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!