धामणगाव रेल्वे

महावितरण वसुली अधिकाऱ्याचा महाप्रताप ; स्मार्ट मीटरच्या सक्तीसाठी एका कुटुंबाला ४ दिवस ठेवले अंधारात

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील महावितरण च्या वसुली अधिकाऱ्यांनी ग्राहक स्मार्ट मीटर बसविण्याची परवानगी देत नाही म्हणून त्याच्या कुटुंबाला तब्बल ४ दिवस अंधारात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एक लहानशा गावातून समोर आला आहे. त्यामुळे वसुली अधिकाऱ्याचा महाप्रताप उघडकीस आला आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, सध्या धामणगाव शहरात वीज बिल वसुलीचे काम महिला अधिकारी जयसिंगपूरे यांच्याकडे असून ग्राहकाने २ महिने आपले वीज भरले नसल्यास त्यांच्या घराचे वीज बिल कनेक्शन अति तातडीने कापण्याचे काम जोरात सुरु आहे. अशीच एक कारवाई महिला अधिकारी जयसिंगपूरे यांनी तालुक्यातील गंगाजळी गावात केली. एका गरीब कुटुंबाने फक्त १५६० रुपये २ महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन खांबावरून कापून टाकले, तुम्ही कनेक्शन परत जोडाल म्हणून ३० फूट खांबावर असलेला केबलच चक्क काढून बाजूला ठेवला. घरचे वीज कनेक्शन कापण्यात आल्याने ते पुन्हा सुरु करावे म्हणून त्या कुटुंबातील प्रामुख्याने दुसऱ्याला विनवणी करीत ऑनलाईन वीज बिल भरले आणि लाईन जोडून देण्याची वायरमन ला विनंती मात्र इथे खरी दादागिरी महावितरण च्या अधिकाऱ्याकडून सुरु झाली.

स्मार्ट मीटर बसवा नाहीतर अंधारात राहा ! – वसुली अधिकाऱ्याची भूमिका

वीज बिल भरल्यानंतर लाईन जोडून देण्यासाठी वायरमन ला म्हटले असता त्यांनी स्मार्ट मीटर लावावे लागेल तेव्हा लाईन जोडून देतो असे म्हटले असता त्या ग्राहकाने स्मार्ट मीटर ला नकार दिला, त्यामुळे हा विषय वाढत गेल्याने वायरमन ने आपल्या वसुली अधिकाऱ्याकडे फोन लावून त्या ग्राहकाचे बोलणे करून दिले तर त्या महिला अधिकाऱ्याने सुद्धा तुमचे मीटर टीडी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता स्मार्टमीटरच बसवावे लागेल अन्यथा लाईन जोडल्या जाणार नाही असे स्पस्ट सांगितले. आणि फक्त सांगितले नाही तर आपल्या कृतीतून करून दाखविले. स्मार्ट मीटर ला विरोध असल्यामुळे चक्क एक दोन दिवस नाही तर ४ दिवस त्या कुटुंबाला अंधारात रात्र काढावी लागली. शेवटी ८ वी मध्ये शिकत असलेल्या व तिच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पाहून नमतेघेत ५ व्या दिवशी स्मार्ट मीटर बसविण्याची परवानगी दिल्याने लाईन पूर्ववत सुरु करण्यात आली.
एक महिला अधिकारी असतांनाही ग्राहकाने फक्त १५६० रुपये बिल न भरल्यामुळे त्याची लाईन कपात करण्यात येते, आणि वीजबिल भरल्यानंतरही स्मार्ट मीटरची सक्ती करण्यासाठी त्या कुटुंबाला तब्बल ४ दिवस अंधाराचा सामना करावा लागल्याने महावितरण च्या अधिकाऱ्यांमध्ये खरंच माणुसकी जिवंत राहिली आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे काही ठिकाणी अनेक वर्षांपासून वीज बिल भरण्यात येत नसून त्यांचे वीज कनेक्शन कधीच कपात होत नाही. आणि दुसरीकडे फक्त १५६० रुपयांसाठी गरीब लोकांची लाईन कपात करून त्यांना स्मार्ट मीटरसाठी चार चार दिवस अंधारात राहावे लागते.
सदरच्या विषयासंदर्भात वसुली अधिकारी जयसिंगपूरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला मीटर टीडी झाल्यानंतर स्मार्ट मीटर बसविण्याची वरूनच ऑर्डर असल्याचे सांगितले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!