धामणगाव रेल्वे

परशुराम महिला सेवा समितीच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे हरियाली तीज उत्साहात साजरी

श्रावण महिन्यात वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम

धामणगाव रेल्वे

पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून स्थानिक परशुराम महिला सेवा समितीच्या वतीने हरियाली तीजचा सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावण महिना हा निसर्गाच्या सौंदर्याचा, भक्तिभावाचा आणि हिरवळीचा महिना मानला जातो. याच श्रावणी निसर्गाचे महत्त्व जपत या कार्यक्रमात धार्मिक उत्साहासोबतच वृक्षारोपणाचा सामाजिक व पर्यावरणाभिमुख उपक्रमही राबवण्यात आला. ​कार्यक्रमात महिलांनी श्रावण महिन्यातील हरियाली तीजचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केले. श्रावणात सर्वत्र पसरणारी हिरवळ आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश देत उपस्थित महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.



या यशस्वी आयोजनात किरण शर्मा, दीपा पालीवाल, उषा शर्मा, भावना गोरिया, शिवानी पालीवाल, चंचल शर्मा, अनुराधा पालीवाल, पायल शर्मा, राधा पालीवाल, उषा शर्मा, भगवती पालीवाल, पूजा शर्मा, अंजू पुरोहित, अर्चना शर्मा , कंचन शर्मा आणि रंजना चौबे यांचा सक्रीय सहभाग होता.


संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी चौबे आणि कु. कनिष्का पालीवाल यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. भक्तिभाव, निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!