धामणगाव रेल्वे

आठवडी बाजार परिसरात दत्तापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; ७६० किलो गौमांस जप्त ; आरोपी अटकेत

 पोलिसांच्या कारवाईने आठवडी बाजार परिसरात खळबळ

धामणगाव रेल्वे

दि. १६ ऑगस्ट २६ रोजी आठवडी बाजारात सुरु असेलेल्या अवैधरित्या गौवंशाची कत्तल करणाऱ्याच्या घरावर धाड टाकून तब्बल ७ क्विंटल ६० किलो गौमांस जप्त करून आरोपीना अटक केली आहे.
कुरेशी मोहल्ला आठवडी बाजार दत्तापुर येथे दोन ठिकाणी अवैधरित्या गोवंशाची कत्तल करणे चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने दत्तापूर पोलिसांनी पंचासमक्ष जागेवर धाड टाकली आरोपी मोहम्मद जावेद गुलाम नेबी वय ५४ वर्ष आठवडी बाजार दत्तापुर, यांच्या घरात २ क्विंटल ३० किलो गोवंश मास, किंमत ४६ हजार रु व गोमांस कापन्या करीत वापरलेले लोखंडी सुरा, कुऱ्हाड असा माल मिळून आला
तसेच दुसऱ्या ठिकाणा वरून ५ क्विंटल ३० किलो गौमास, व कापण्याकरिता वापरले लोखंडी सुरे, कुऱ्हाड, लाकडी ठोकला असा एकूण १ लाख ६ हजार ३५० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असून आरोपी १, तहीर अहेमद मोहम्मद सादिक, वय ३४ वर्षे. २, मोहम्मद फझील मोहम्मद झाकीर, वय २७ दोन्ही रा आठवडी बाजार दत्तापुर हे गौवंशाची कत्तल करीत असताना जागीच मिळून आले. आरोपी क्र ३ मोहम्मद साजिद मोहम्मद साबीर, रा आठवडी बाजार दत्तापुर हा घटनास्थळ वरून पळून गेला होता. मात्र द.पोलिसांनी शिताफीने फरार आरोपी मोहमद साजिद मोहम्मद साबीर याला सुद्धा अटक करण्यात आली. पोलीस स्टेशन दत्तापुर येथे प्राणी संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत आरोपी विरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त केलेलं गौमांस सुरक्षितरित्या मातीत गाढण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम अमरावती ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार चांदुर रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन मेहेत्रे, स.पो.नि गजानन गजभारे, पो.उप.नी हरिहर गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिहर वैद्य, अतुल पाटील, दीपक पंधरे, प्रवीण चौधरी, सोनू भालेराव, मयुर धवक, उमेश यादव, अभय जाधव, दुर्गा झेले, जयश्री ताथड, चालक मनोज धोटे यांनी केली.

 

केलेल्या धडाकेबाज कारवाईसाठी युवा पत्रकार संघटना महाराष्ठ्र राज्य अध्यक्ष संजय सोयरे यांनी सहाय्यक पो. नि गजानन गजभारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!