धामणगाव रेल्वे

अतिक्रमण धारकांकडून जागा मोजून देण्याच्या नावावर सरपंचाच्या पतीने उकळले पैसे

शेंदुर्जना खुर्द येथील सरपंच पती संतोष समोसे चा कारनामा उघड

धामणगाव रेल्वे

सध्यस्थित शासकीय योजनेनुसार अतिक्रमणधारकांना हक्काचे पट्टे देण्यासाठी प्रशासन उपक्रम राबवित आहे. मात्र तालुक्यातील शेंदुर्जना खुर्द या गावात अतिक्रमणधारकांकडून जागा मोजण्यासाठी प्रति १ हजार प्रमाणे नागरिकांकडून सरपंच शीतल समोसे यांचे पती संतोष समोसे यांनी पैसे घेतल्याचा आरोप करीत आज पंचायत समिती साहायक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी करून आमचे पैसे परत करून, शासकीय योजनेनुसार प्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

नावालाच महिला सरपंच कारभारी मात्र सरपंच पती – अधिकारीही मारतात सरपंच साहेब म्हणून हाक

सदर विषयाचे निवेदन पंचायत समिती येथे देण्याकरिता नागरिक सह प्रहारचे तालुकाप्रमुख सुरज गंथडे आले असता त्याच ठिकाणी संतोष समोसे हि ग्रामपंचामतमधील अतिक्रमण धारकांची फाईल घेऊन आले असताना उपस्थित अधिकाऱ्यांनी सुद्धा सरपंच साहेब म्हणून त्यांना हाक मारली. मात्र गावच्या सरपंच त्यांच्या पत्नी असल्याचे माहित पडताच सुरज गंथडे यांनी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. सरपंच महिला असताना त्यांचा कारभार पती पाहतो कसा आणि तुम्ही सुद्धा त्यांना सरपंच साहेब म्हणून हाक मारता कसे असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. अधिकाऱ्यासमोरच झालेला हा प्रकार शासन नियमांना हरताळ फासणारा आहे. सरपंच महिला असतानाही पूर्ण कारभार हा पतीचं पाहत असल्याचे या निम्मिताने दिसून आले. त्यामुळे महिला सक्षमीकरणाचा बोजवाराच होत असल्याचे बोलल्या जात आहे.

 

महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून महिलांना ५० % आरक्षण देण्यात आले असताना ग्रामीण भागात अद्यापही कारभारी हे महिला पतीचं आहे. आणि अधिकारी सुद्धा त्यांनाच साहेब साहेब म्हणून पाठबळ देतात. त्यामुळे शासन निर्णय नावालाच आहे का ? त्याची अंमलबजावणी का होत नाही  – सुरज गंथडे, प्रहार तालुका प्रमुख धा. रे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!