धामणगाव रेल्वे

शाळेचा पहिला दिवस झाला गोड ; मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकाचे वितरण

शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेची मिष्ठान्न भोजनाचे सुरुवात

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देऊन सुरुवात करण्यात आली. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष योगिता नागोसे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंजू बोरकर, मुख्याध्यापिका रूपाली देशमुख, करुणा बभुतकर, पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गावकरी यांच्यासह आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली देशमुख तसेच सहाय्यक शिक्षिका करुणा भबूतकार त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, स्वच्छता, शिस्त आणि मन लावून अभ्यास करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता दिसून आली. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाल्याने पालक आणि ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!