धामणगाव रेल्वे

धामणगावात ‘माझं गावं, आरोग्य संपन्न गावं अभियान कार्यशाळा संपन्न ‘

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील तहसील कार्यालय सभागृह धामणगाव येथील डॉ. प्रफुल भोरखडे,यांच्या उपस्थित दिनांक २५ जून २०२६ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता माझ गावं, आरोग्य संपन्न गावं अभियान अंतर्गत कार्यशाळा पार पडली, यावेळी डॉ. विवेक सुदेवाड, तालुका आरोग्य अधिकारी, योगेश वानखडे सहाय्यक गटविकास अधिकारी, निलेश वाघ, पी. एन. तेलंग, दीपक नवाथे, गोकुळ बांबल, बी. एम. जयस्वाल बी. एम. सरदार, विशाल सुटे, प्रेम अंबूलकर कार्यक्रम ला हजर होते. माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश लोकसहभागातून गावोगावच्या आरोग्य सुविधा सक्षम करणे आणि उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देवून ग्रामस्थांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सक्रिय सहभाग, स्वच्छता, फिल्ड एफ.टी. के. रासायनिक तपासणी, शुद्धपाणी, जलजन्य, कीटकजन्य, साथीचे आजार, अनेमिया मुक्त भारत, माता-बाल आरोग्य, टी. बी. मुक्त ग्रामपंचायत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, संसर्गिक आजर, असंसर्गिक आजार, आयुष्यमान गोल्डन कार्ड, आभा कार्ड, सिकलसेल, अ्निमिया जनजागृती, आणि १००% आरोग्य योजनां बाबत सरपंच,प्रशासक,ग्राम पंचायत अधिकारीना यावेळी माहिती देऊन मार्गदर्शन केलेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!