धामणगाव रेल्वे

धामणगावातील प्रत्येक गावात पल्स पोलिओ मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद

डॉ. हर्षल क्षीरसागर, डॉ. विवेक सुदेवाड यांच्या विविध प्रा. आरोग्य केंद्राला भेटी

धामणगाव रेल्वे 

शासनातर्फे पोलिओमुक्त भारत करण्यासाठी २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान तालुका आरोग्य विभागातर्फे प्रत्येक नागरिकांपर्यंत या मोहिमेची जनजागृती करण्यात आली असताना धामणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांकडून आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बाळाला स्वयंस्फूर्तपणे पोलिओचे डोस देण्यासाठी केंद्रावर आणण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून आले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळखुटा येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचे सुरवात करण्यात आली, दुपारी १२ वाजेपर्यंत ० ते ५ या वयोगटातील ७५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

प्रहार तालुकाप्रमुख सुरज मधुकर गंथडे सह सौ. अश्विनीताई सुरज गंथडे आपल्या बाळाला पोलीस डोस देताना, सोबत महिला आरोग्य कर्मचारी उपस्थित होत्या.

 

विरूळ रोंघे येथे वनसंरक्षक रोशन ठवकर आपल्या मुलीला पोलीस डोस देत असताना उपस्थिती तालुका आरोग्य अधिकारी विवेक सुदेवाड सह कर्मचारी

 

ग्रामीण रुग्णालय येथे बाळाला पोलिओ डोस देताना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर सह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सुदेवाड कर्मचारी राजेंद्र जगताप यांची उपस्थिती.

 

प्रा. आरोग्य केंद्र अंजनसिंगी येथे बाळाला पोलिओ डोस देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सुदेवाड सह डॉ. हर्षल क्षीरसागर, राजेंद्र चंदणे व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

 

यावेळी अमरावती जिल्ह्याचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सुदेवाड यांनी तालुक्यातील विविध प्रा. आरोग्य केंद्राला भेटी देत पल्स पोलिओ मोहिमेचा आढावा घेतला.

सदरच्या पोलिओमुक्त भारत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!