मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : गंभीर जखमी
अमरावती – अविनाश गोंडाणे
शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात आज पहाटे एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात संबंधित वृद्ध नागरिक पिंजरकर हे गंभीर जखमी झाले असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दिनांक २४ जून रोजी पहाटे सव्वा पाचच्या वाजताच्या सुमारास आशियाड कॉलनी येथील रहिवास पिंजरकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या एका रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, डुकराने श्री पिंजरकर यांच्या संपूर्ण अंगावर ठिकठिकाणी गंभीर चावे घेतले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आपले एक बोटही गमावावे लागले आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Add Comment