धामणगाव रेल्वे
दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, एनसीसी तसेच स्काऊट-गाईडचे कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमात विद्यालयाचे शारीरिक शिक्षक सौरभ पांडे व शोभेराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने योगाभ्यास करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले. नियमित योग व प्राणायामामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ राहते, तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.यावेळी उपप्राचार्य प्रमोद हातेकर व पर्यवेक्षक नरेश कावलकर उपस्थित होते.















Add Comment