शास्त्री चौक ते से.फ. ला रोडवर बंदी असतानाही खुलेआमपणे सुरु आहे जड वाहतूक
धामणगाव रेल्वे
शहरातील बहु प्रतिक्षीत असलेला शाश्त्री चौक ते से.फ. ला रोड चे बांधकाम मागील अनेक महिन्यापासून सुरु असून ते बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुध्दा नागरिकांना बहू प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे चित्र धामणगावकरांसमोर आहे. रस्ता बांधकाम अतिशय संथगतीने सुरु असल्याकारनाने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरु असून तसेच शालेयवर्ग सुरु होत असताना सुरक्षेच्या दृष्टीने सदरच्या रोडवर जड वाहतुकीला बायपास मार्गाने वळविण्यात येण्यासंदर्भात दि. ३ जून रोजी नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनम कळंबे यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्या पत्रावर पूर्णतः अंमलबजावणी होत असतानाचे दिसून येत नाही…
रस्त्याचे एक साईड चे काम सुरु असताना फक्त एकच साईड वाहतुकीसाठी सुरु आहे त्यामुळे आधीच सामान्य वाहतूकदाराचा त्या ठिकाणाहून गोंधळ उडत असताना जड वाहनाला बंदी असतानाही ते खुलेआमपणे सुरु असल्यामुळे नाकरिकाना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नेमकी कुणाच्या आशीर्वादाने ही जड वाहतूक सुरु आहे. अद्यापही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे. मुख्यधिकारी यांनी काढलेल्या पत्रावर अंमलबजावणी कधी होणार ? कि एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येईल असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्याना पडत आहे.
Add Comment