धामणगाव रेल्वे

चिंचपुरात पाण्यासाठी ग्रामस्थांचा हाहाकार ; दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा माजी उपसरपंच शिशिर शेंडे यांचा आरोप

धामणगाव रेल्वे 

चिंचपूर गावातील नदीला मुबलक पाणी असताना इतर शहरात गावातून पाण्याचा पुरवठा होते मात्र गावातीलच नागरिकांना स्वच्छ आणि वेळेवर पाणी उपलब्ध होत नसल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर आला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाकडे तसेच गावातील विविध जनसुविधांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

चिंचपूर गावात होत असलेला दूषित पाणी पुरवठा

गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गटारांची नियमित साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन, पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती यांसारख्या मूलभूत सुविधांकडे सुद्धा जाणीवपूर्वक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने तसेच १५ दिवसानंतर नळाला पाणी येत असून ते सुद्दा वापरण्याजोगे येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तब्बल १० लाखाच्या जवळपास नागरिकांकडून ग्रा. प. प्रशासनाने कर वसुली केली मात्र सुविधेच्या नावावर जनतेला ठेंगाच मिळाला आहे. पावसाळ्याचे दिवस असताना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – शिशिर शेंडे – माजी उपसरपंच , चिंचपूर

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!