राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
धामणगाव रेल्वे
पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२६-२७ अंतर्गत क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १५ जून २६ रोजी धामणगाव रेल्वे येथील तहसील हॉल येथे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाला पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल भोरखडे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकदिवसीय विकास आराखडा प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी प्रफुल भोरखडे
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ग्राविकास अधिकारी प्रफुल भोरखडे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये गटविकास अधिकारी प्रफुल भोरखडे यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती मधील विकास कामासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन आले. तसेच विविध सूचना दिल्या.















Add Comment