मोर्शी प्रतिनिधी
अमरावती राज्याच्या सिमेलगत असलेले ग्राम सालबर्डी, घोडदेव, झुनकार गावाचे लगत असलेल्या जंगल नाल्याच्या काठावर गावठी हात भट्टीवर धाड टाकत मोर्शी पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल ४ लक्ष ३० हजाराचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
पोलीस अधिक्षक निकेतन कदम अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामीण जिल्ह्या सिमेलगत मध्यप्रदेश राज्यातील पोलीसांशी संपर्क करून मध्यप्रदेश राज्यामधिल गावामध्ये असलेल्या गावठी हात भट्टीची दारू गाळण्याच्या अड्डयांवर संयुक्त कार्यवाही करण्याबाबत निर्देशीत केले असता पोलीस निरिक्षक राहुल आठवले ठाणेदार पोलीस स्टेशन मोर्शी यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी, अंमलदार तसेच आर सि पि प्लाटुन व मध्यप्रदेश राज्यामधिल पोलीस स्टेशन मुलताई अंतर्गत मासोद चौकीमधील पोलीस अंमलदार यांचे सोबत समन्वय साधुन योजना आखुन गोपनियतेने थेट दि. ०३ जून २६ रोजी सकाळी ०६.०० ते १०.०० वाजता दरम्यान पोलीस स्टेशन मोर्शी जि अमरावती महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेले ग्राम सालबर्डी, घोडदेव, झुनकार गावाचे लगत असलेल्या जंगल नाल्याच्या काठावर काही अज्ञात ईसम चालवित असलेल्या गावठी हात भट्टीची दारू गाळण्याच्या अड्यांवर छापा टाकुन गावठी हात भट्टी दारू काढण्याचे साहीत्य किं अं ३०,०००/- रू तसेच मांच मोहाचा सडवा एकुण २० ड्राम किं अं ४,००,०००/- रू असा एकुण ४,३०,०००/- रू चा माल नाश केला.













Add Comment