धामणगाव रेल्वे

स्व-जनगणना पूर्ण करण्यात अमरावती जिल्ह्यातुन महिमापूर गावाने मिळवले अव्वल स्थान

महिमापूर ग्रामस्थानी केली शंभर टक्के स्वगणना

धामणगाव रेल्वे

केंद्र सरकारच्या आदेशान्वये सुरू करण्यात आलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून ही जनगणना डिजिटल होणार आहे. त्यातील स्व-जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला असून यामध्ये अमरावती जिल्ह्यातुन धामणगाव तालुक्यामधील महिमापुर या गावात १००% स्वगणना झाल्याने हे गाव डिजिटल क्रांतीत जनगणनेमध्ये पहिलेच ठरले आहे.
धामणगाव तालुक्यामध्ये स्वगणनेला प्रारंभ करण्यात आला असताना दि. १२ मे रोजी मौजा महिमापुर या गावाने एक नवा आदर्श प्रस्थापित करीत गावातील सर्व कुटुंबाची स्वगणना अवघ्या एका दिवसात पूर्ण केलेली आहे. त्यामुळे स्वगणनेचा टप्पा गाठणारे धामणगाव रेल्वे तालुक्यातील महिमापुर हे गाव अमरावती जिल्ह्यातून पहिले ठरले आहे.

यामध्ये महसूल विभाग तसेच पंचायत समितीच्या पथकाने महिमापूर गावात मुक्काम ठोकून ग्रामस्थांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले घराघरात जाऊन मोबाईलवर स्व जनगणना कशी करावी, माहिती कशी भरावी तसेच आवश्यक कागदपत्राची माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला. गावातील युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी डिजिटल पद्धतीने माहिती भरून शासनाच्या या मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे महिमापुर हे गाव जिल्ह्यातील पहिले स्वगणना पूर्ण करणारे गाव म्हणून नावलौकीस आलेले आहेत.
३२५ लोकसंख्या असेलेल्या महिमापूर गावातील ५२ घरे व ७५ कुटुंबाची स्वजनगणना पूर्ण झाली आहे. यावेळी तहसीलदार अभय घोरपडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरकडे यांनी गावाला भेट देऊन जनगणना मोहिमेचा आढावा घेतला.
महिमापुर गावातील शंभर टक्के स्वगणना करण्यासाठी महसूल विभागातील विशेषतः दत्तापूर मंडळ अधिकारी संगीता धारणे, तलाठी विजय गाते, सुमया पटेल, राजलक्ष्मी गौतम, शिवदास वाघमारे, तातेश्वर पाटील राहुल पराते, गणेश उईके, पूजा बोटरे, प्रभा उपासे, सागर भांडवले, परेश धर्माळे, प्रियंका अलोणे, अजय नेरकर, प्रगती वानखडे, पोलीस पाटील वासनिक, वेदांत राऊत, अमोल कांबळे, प्रगनक सालेमा रिजवी, प्रशिक्षक गोपाल नागरीकर, दिनेश ठाकरे, किशोर जऱ्हाड तसेच गावातील समस्त नागरिक यांनी विशेष मेहनत घेतली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!