युवा संघटित पत्रकार संघाची दत्तापूर पोलिसांकडे कारवाईची मागणी
धामणगाव रेल्वे
शहरात दिवसेंदिवस अल्पवयीनांचा दुचाकी चालविण्याचा प्रकार सातत्याने वाढत आहे. मात्र अतिवेगाने दुचाकी चालवीत असताना गाडी कंट्रोल न झाल्यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहे. सदर अपघाताच्या घटना सातत्याने वाढत असून अध्यापपर्यतही प्रशासनाचे अल्पवयीनांवर वचक नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पालकवर्ग सुद्धा आपला पाल्य लहान वयातच गाडी चालवीत असल्याचे पाहून त्यांना अभिमान वाटतो मात्र अपघात झाल्यावर तेच चुका नेहमी दुसऱ्याची असल्याची भासवतात. यामध्ये फक्त अल्पवयीन मुलांचाच समावेश नसून मुलीदेखील कुठेच कमी नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वेळीच यावर आवार घालणे गरजेचे झाले आहे.

बुलेटधारकांचा मुख्य रस्त्यावर हैदोस ; कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास
मागील ३ ते ४ दिवपासून एक वेगळाच कहर धामणगाव शहरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे. ते म्हणजे काही हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांकडून आपल्या गाडीचे ( बुलेट , ड्यूक ) सायलेन्सर बदलून जणू वेगवेगळे कर्णकर्कश आवाज काढण्याची स्पर्धाच लागली आहे. सदरचा आवाज इतका कर्णकर्कश असतो कि, गाडी अर्धा किमी समोर गेली तरी त्याचा आवाज कानात घुमतो. मागच्या ३ ते ४ दिवपासून हा प्रकार सातत्याने सुरु असून जाणीवपूर्वक इतरांचे लक्ष वेधनासाठी मुख्य रस्त्याने सायलेन्सरचा आवाज करीत आहे. त्यामुळे सामान्यांना या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये नगरपरिषद येथील कर्मचाऱ्याचा मुलाचा देखील समावेश असल्याचे बोलल्या जात आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा कोलमडली ; बेशिस्त वाहनधारकांमुळे लगेच होतात ट्राफिक जाम
मध्यंतरी काळात पोलीस प्रशासनाकडून काही दिवस दंडात्मक कारवाई करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली होती मात्र कारवाई थांबताच पुन्हा जैसे थेच परिस्थिती धामणगावात पाहायला मिळत आहे. बेशिस्त वाहन धारकांकडून कुठेही रस्त्यावर वाहने उभे करण्याचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. त्याचाच परिणाम दिवसातून अनेकवेळा मुख्य रस्त्यावर ट्राफिक ची समस्या सातत्याने वाढली असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.















Add Comment