धामणगाव रेल्वे

खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते बाजार समितीत विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा

आधुनिक सुविधा, शेतकरी मार्गदर्शन आणि कोब्रा कमांडोचा हृदयस्पर्शी सत्कार

धामणगाव रेल्वे

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मार्गदर्शन मेळावा सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले.
अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण, सुसज्ज भोजनकक्ष, स्वच्छतागृह तसेच नवीन लिलाव गृहाचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेत शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचा संकल्प व्यक्त केला. खासदार वानखडे यांनी बाजार समितीच्या पारदर्शक व शेतकरी हिताच्या कार्याचे कौतुक केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित मार्गदर्शन सत्रात अमरावती येथील प्रख्यात कृषी तज्ज्ञ सुधीर जगताप यांनी ‘तूर पीक व्यवस्थापन’ या विषयावर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व कीड नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ‘अमृत पॅटर्न’चे जनक अमृतराव देशमुख यांनी कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचा जाहीर हृदयसत्कार. झारखंडच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या राऊत यांच्या सन्मानावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले.
या कार्यक्रमाला ‘आदर्श यशवंत ग्राम झाडा’चे शिल्पकार विजय उगले, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती संगिता संजय गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर बाजार समितीचे माजी सभापती रामदास निस्ताने, संजय गाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे, दत्तापूर खरेदी-विक्री सेवा सोसायटीचे बबनराव मांडवगणे, चांदूर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गोविंद देशमुख, चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर, संचालक रवी भुतडा(बांधकाम सभापती), डॉ. प्रमोद रोंघे, चंदाताई निस्ताने, विपीन ठाकरे, दिनेश जगताप, सचिन सोमोसे, मेघा सबाने, संदीप दावेदार, देवराव बमनोटे, मुकुंद माहोरे, मंगेश बोबडे, विलास भिल, गिरीश भुतडा, राधेश्याम चांडक व सुनील ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच आडते व्यापारी, हमाल, मापारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या विकासकामांमुळे धामणगाव रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून बाजार समितीची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समितीचे सचिव प्रविण वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक विलास भिल यांनी मानले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!