धामणगाव रेल्वे सामाजिक

पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ आणि जल दिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा

धामणगाव रेल्वे

येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “आपल्या गावाचा सन्मान” या भावनेतून आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे योग्य नियोजन व नियमित देखभाल याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच जलसंधारण, पाणी बचत आणि स्वच्छ पाणीपुरवठा या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्र येत जलपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाणी वाचवा, पाणी जपा” हा संदेश देत भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला योगेश वानखडे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती धामणगाव रेल्वे), निषादराज सावंत (कनिष्ठ अभियंता), ऋषिकेश परतेकी (कनिष्ठ अभियंता), वर्षा दळवी (कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग), मनोज सरदार (विस्तार अधिकारी, आरोग्य – प्रभारी), जलजीवन मिशन कक्षातील प्रेमकुमार आंबुलकर (गट समन्वयक) व विशाल सुटे (समूह समन्वयक) यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ग्रामपंचायत सचिव पल्लवी रंगारी, प्रशासक दिलीप राऊत, समिती सदस्य, आशाताई रुद्रकार, कुसुमताई टांगले, रवींद्र उगले, अंगणवाडी सेविका व मदतनीस, जय दुर्गा भजन मंडळ, श्री संत शंकर महाराज शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकवृंद तसेच गावातील महिला भगिनी, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावात जलव्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून, ही मोहीम सातत्याने राबविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत पिंपळखुटा व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!