धामणगाव रेल्वे

अखेर…… निर्मल उज्वल बँकेतील सोने चोरी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हे दाखल

बँकमधून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यापैकी ८ पाकिटे झाली होती गायब

धामणगाव रेल्वे

संपूर्ण धामणगाव शहरासह अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या धामणगाव शहराच्या मध्यवस्तीत स्थापित असलेल्या निर्मल उज्वल क्रेडिट को. ऑप सोसायटीच्या बँकेच्या तिजोरीतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यामधून चक्क ८ सोन्याची पाकिटे गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. अखेर दि. २१ फेब्रुवारी रोजी बँकेच्या रिजनल मॅनेजर भावना जोशी यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश बबनराव वानखेडे रा. तिवसा, लिपिक निखिल अरुण क्षीरसागर रा. नूतन चौक, धामणगाव रेल्वे, व रोखपाल हरीश वसंत देवगडे रा. निबोरा बोडखा, ता. धामणगाव रेल्वे यांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१६ ; ५ द अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार गिरीश ताथोड करीत आहे. त्यामुळे लवकरच सदरच्या चोरीप्रकणातील मुख्य सूत्रधार कोण याचा छळा लागण्याची शक्यता आहे.

सदरच्या बँक तिजोरीतील सोने चोरी प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अनेकांनी आपले उर्वरित रक्कम बँकमधून काढल्याची माहिती प्राप्त आहे. घडलेल्या प्रकारामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला असून तसेच कायदेशीर मार्गाने प्रक्रिया सुरु असताना चोरी गेलेल्या सोन्याचे काय ? ते ग्राहकांना परत मिळणार कधी ? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीय आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!